वासीम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । वैयक्तिक वादातून झालेल्या किरकोळ भांडण विकोपाला जावून दोन तरूणांवर पिस्तूलासह कोयत्याने वार करून जखमी ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित आरोपींना हिंगोलीतून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील निमजगा ते वाळकी मांजरे रोडवर १४ ऑगस्टच्या रात्री जुन्या वैयक्तिक वादातून किरकोळ भांडण करण्यात आली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन तरूणांवर थेट पिस्तूलाने गोळीबार केल्यानंतर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला चढविण्यात आला होता. घटनेनंतर संशयित आरोपी हे फरार झाले होते. याप्रकरणी वासिम शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता
दरम्यान गोपनीय माहितीवरून वाशिम शहर पोलिसांच्या तपास पथकाने या प्रकरणातील २ संशियतांना हिंगोली जिल्ह्यातून ताब्यात घेतले. या दोघांना कनेरगाव नाका (जिल्हा हिंगोली) येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान पोलिस उपनिरिक्षत सचिन गोखले अधिक तपास करत आहेत.
सुजाण नागरिकांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र धारकांची माहिती असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL ११२ ला द्यावी. माहिती देणा-या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



