यावल (प्रातिनिधी)। तालुक्यातील डोंगरकठोरा येथे होळीच्या दिवशी होळीच्या दांडयाच्या मिरवणुकीत डफ जोरात वाजविले या कारणावरून गावात दोन गटात तुबंळ हाणामारीची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून मुख्यसंयशीत आरोपीसह इतर चार जण फरार आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगरकठोरा या गावात काल रात्री ७ ते १ वाजेच्या दरम्यान संयशीत आरोपी गिरीष राजेश पाटील, मयुर लीलाधर जंगले, आकाश निळकंठ लोखंडे, व एक महीला व गुन्ह्यातील फरार आरोपी लिलाधर दयाराम जंगले, पवन आनंदा नाले, भुसावळ येथील नगरसेवक नितिन बाबुराव धांडे, यांनी संगनमताने शेजारीच राहणारे नरेन्द्र भास्कर पाटील यांच्या घरावर लोखंडी रॉड व लोखंडी पाईपाने मारहाण केली असुन रात्री 1 वाजेच्या सुमारास संयशीतांनी घरवर भुसावळचे काही गुंड प्रवृत्तीचे लोकांना बोलवुन मारहाणीच्या घटनेत सहभागी असल्याचे पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीसात दाखल करण्यात आलेल्या भादवी कलम १४३, १४७, १४९, २२३, ३र४, ५०४, ५०६, ४५२, ३४ प्रमाणे गुन्हा राखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीसांचा बंदोबस्त वाढविला
काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात आज होणारी यात्रेवर व बारा गाड्याच्या कार्यक्रमावर घटनेचे प्रसाद उमटले असुन गावात पोलीस बंदोस्त वाढवण्यात आला आहे. डोंगरकठोरा या गावात मध्यरात्री घडलेल्या दोन गटाच्या मारहाणी एक जणाला डोक्याला मार लागल्याने जख्मी झाले असुन एका महीलेचा विनयभंग करण्यात आला आहे.