जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून भाडेकरूंमध्ये हाणामारी होवून दोन बहिणींचा विनयभंग केल्याची प्रकार घडला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात दोन बहिणी ह्या भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या घराच्या शेजारी मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी हे दाम्पत्य राहते. गुरूवार २८ जुलै रोजी सायंकाळी घरात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन्ही बहिणी आणि दाम्पत्यामध्ये वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यातील मनोज कोळी याने दोन्ही बहिणींशी धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत रात्री ९ वाजता दोन्ही बहिणींनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.