पुण्यात अज्ञात वाहनाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा। पुण्यात रविवारी ७ जुलै रोजी हिट अँड रन अपघात घडला. या अपघातात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार. पुणे मुंबई मार्गावर बोपाडी परिसरात एका अज्ञात वाहनाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा पोलिस गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. हा अपघात कशा झाला या संदर्भात नेमकी माहिती समोर आलेली नाही.

समाधान कोळी असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पी. सी, शिंदे असं अपघातात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. माहितीनुसार, दोघे ही दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, एका जण जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरु करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. पोलिसांनी समाधान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content