रावेरात ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील अटवाडा शिवारात एक हृदयद्रावक अपघात घडला असून, ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव सुनिल भिका कोळी (वय ३९) असून तो आपल्या चुलत भावाच्या, किरण सोपान कोळी यांच्या शेतातील तुर ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करत होता. दुपारी सुमारास, शेतातून तुर भरून परतताना ट्रॅक्टर शेताच्या बांधावरून जात असताना रस्त्याच्या खराब अवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने ट्रॅक्टरचे धुड अचानक पलटी झाले.

या अपघातात सुनिल ट्रॅक्टरच्या खाली दाबला गेला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद रावेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यासंदर्भातील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन डांबरे करत आहेत.

Protected Content