चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील साकुर फाट्याजवळ मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उभ्या ट्रॅक्टरला भरधाव दुचाकी आदळल्याने मांदुरने येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समाधान रावण पाटील वय-२४ आणि कैलास धनराज पाटील वय-४० दोन्ही रा. मांदुरने ता.चाळीसगाव असे मयत झालेल्या दोन्ही तरूणांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान पाटील आणि कैलास पाटील हे दोघे चाळीसगाव तालुक्यातील मांदुरने येथील रहिवाशी होते. चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे दोघेजण दुचाकीने तमाशा पाहण्यासाठी गेले होते. गुरूवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तमाशा पाहून दोघेजण घरी परतत असतांना चाळीसगाव तालुक्यातील साकुर फाटा येथे रस्त्यावर उसाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी जोरदार आदळली त्यामुळे दुचाकीवरील कैलास पाटील आणि धनराज पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून मदत केली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.