Home क्राईम काश्मीरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा सफाया

काश्मीरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा सफाया


0a63ba1570adc5dc676f2135d2f17c70

श्रीनगर (वृत्तसंस्था) काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्याला भारतीय लष्कराला यश आले आहे. गहंड परिसरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, त्यानंतर त्यांचा घेराव करून केलेल्या कारवाईत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

 

लष्कराच्या ३४ आरआर तुकडी आणि एसओजीने शोधमोहिम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत दोन दहशतवादी ठार केले. याआधी शनिवारीही दहशतवाद्यांसोबत अशीच चकमक झाली होती. यावेळीही दोन दहशतवादी ठार झाले होते. मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिज्बूलचा तर दुसरा एम टेकचा विद्यार्थी होता. गांदरबल जिल्ह्यातील नुनेर गावचा राहिल राशीद शेख हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. तीन दिवसांपूर्वीच तो दहशतवादी बनला होता तर मारला गेलेला दुसरा दहशतवादी हा किगम गावातील बिलाल अहमद होता. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी शोधमोहिम हाती घेत परिसरात राज्य पोलिसासंह विशेष मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे या भागात लपलेले दहशतवादी बिथरले असून जवानांवर गोळीबार करीत आहेत. भारतीय जवानही त्यांना सडेतोड उत्तर देत त्यांचा सफाया करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound