मुंबई-वृत्तसेवा । देशात घरगुती एलपीजी सिलेंडरबाबत मोठा धोरणात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या वापरात असलेल्या १४.२ किलोच्या सिलेंडरऐवजी भविष्यात ८ ते १० किलो गॅस पुरवठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेली अस्थिरता, विशेषतः इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने हा निर्णय चर्चेत आला आहे.
