आदर्श नगरात घरफोड; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने व नेकलेस चोरून नेल्याचे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल शिरीष भंडारी (वय-३७) रा. उज्ज्वल स्कूल जवळ, आदर्श नगर जळगाव हे कुटुंबियासह राहतात. त्याचा कॅम्प्यूटरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. हर्षल भंडारी हे अमळनेर येथील मुळे रहिवाशी आहे. त्यांच्या घरी कानुबाईचा कार्यक्रम असल्यामुळे भंडारी हे आपल्या कुटुंबियांसह शनिवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून अमळनेरला निघून गेले. दरम्यान आज सोमवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारे राजेंद्र पाटील यांनी हर्षल भंडारी यांना घरात चोरी झाल्याचे फोनद्वारे कळविले. घरात चोरी झाल्याचे समजताच भंडारी कुटुंबिय सकाळी ९.४५ वाजता घरी पोहचले. यात घरातील सामान अस्तव्यस्त केलेले दिसून आले. यात कपाटात ठेवलेले १ लाख ३९ हजार ५०० रूपयांची रोकड, १३ हजार रूपये किंमतीची ११ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ७ हजार २०० रूपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रूपये किंमतीच्या सोन्या लहान मोठ्या सोन्याच्या अंगठ्या आणि ८ हजार रूपये किंमतीचा डायमंड नेकलेस असा एकुण १ लाख ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी हर्षल भंडारी यांनी आज सकाळी ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक बिरारी करीत आहे. 

 

Protected Content