जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील रेमंड कॉलनी परिसरात बंद घरातून मध्यरात्री ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार विरेंद्रसिंग (वय-३८) रा. रेमंड कॉलनी, एमआयडीसी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २ ऑगस्ट रेाजी रात्री १२ वाजता ते कुटुंबीयांसह जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात असलेले ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेण्याचे बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.