महिलेच्या पर्समधून दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोकडची चोरी

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हॉटेल सुगोकी लॉन्स येथून महिलेच्या पर्समधून दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकुण १८ हजार ६१० रूपयांची मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उर्मिला प्रमोद ठाकूर वय ५२ रा. सिध्दी विनायक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव या महिला पाळधी येथील सुगोकी लॉन येथे एका कार्यक्रमासाठी सोमवारी ११ मार्च रोजी रात्री ९ वाजता गेलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून पर्समधून दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकुण १८ हजार ६१० रूपयांची मुद्देमाल चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर महिलेने सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला परंतू मोबाईलबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content