अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील डांगरी गावात काहीही एक कारण नसतांना कुटुंबातील दोन जणांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश उत्तमराव शिसोदे वय ५८ रा. डांगरी ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते घराच्या अंगणात खाट टाकून गप्पा मारत असतांना गावात राहणारा नाना रामभाऊ शिसोदे हा काहीही एक कारण नसतांना चाकूने वार करून सोबत असलेले राजेंद्र भिमराव शिसोदे आणि त्यांचा मुलगा सारंग प्रकाश शिसोदे यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करून आज जीवंत सोडत नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी प्रकाश शिसोदे यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाना रामभाऊ शिसोदे रा. डांगरी ता. अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल तेली हे करीत आहे.