तासाभरात गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका

 

मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना आणि आर्थिक विकासाची निराशाजनक आकडेवारीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज सकाळपासून जोरदार विक्री सुरु केली आहे. यामुळे सेन्सेक्स ६५० अंकांनी कोसळला. निफ्टीत १४० अंकांची घसरण झाली आहे. अवघ्या तासभरात गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका बसला आहे.

सध्या बाजारात सर्वच क्षेत्रात जोरदार विक्री सुरु आहे. एचडीएफसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टीसीएस, आयटीसी, एसबीआय आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे.

गुरुवारी निफ्टी ७.५५ अंकांनी घसरला मात्र निफ्टीने ११,५०० अंकांची पातळी कायम ठेवली. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ९५.०९ अंकांनी घटला आणि ३८,९९०.९४ अंकांवर विसावला.व्होडाफोन आयडियाचा स्टॉक २९.८० टक्क्यांनी वाढला होता. भारती इन्फ्राटेल लिमिटेडला इंडस टॉवर मर्जरच्या बोर्डकडून करारास मंजूरी मिळाली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ११.०९ टक्क्यांनी वधारले तो २१७.८० रुपयांवर बंद झाला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठे अवमूल्यन झाले.रुपया ७३.४७ रुपयांवर बंद झाला. अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराने ठोसपणे व्यापार केला.

Protected Content