Home क्राईम हत्त्या प्रकरणात दोघा भारतीयांना सौदीत मृत्युदंड

हत्त्या प्रकरणात दोघा भारतीयांना सौदीत मृत्युदंड


8a8ac61e0839e8c1b0ec99e18e5dbc07

रियाध (वृत्तसंस्था) आपल्या भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी होशियारपूर येथील सतविंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंगला सौदी अरेबियात मृत्यूदंड देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय दुतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना दिली आहे. मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यावर सौदी प्रशासनाने भारत सरकारला कळवले नव्हते. थेट शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतरही कुठलीच माहिती भारताला कळवण्यात आली नव्हती.

 

हरजीत, सतविंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील एका हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. काही दिवसांनंतर हरजीत सिंग आणि सतविंदर कुमार यांना दारू पिऊन मारामारी केल्याप्रकरणी सौदी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना भारतात परत पाठवण्याचीच तयारी सुरु असतानाच इमामुद्दीनच्या हत्त्येचे प्रकरण उघडकीस आले होते.

त्यानंतर त्या दोघांना तातडीने रियाधला हलवण्यात आले. त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्यावर भारतीय दुतावासाचे लक्ष होते. फेब्रुवारीत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २८ फेब्रुवारी २०१९ ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला, पण याची माहिती मात्र भारतीय दुतावासाला देण्यात आली नाही.
सतविंदरची काहीच खबरबात न मिळाल्याने त्याची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला. यानंतर भारतीय दुतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून मृत्यूदंडाची माहिती मिळवली. दोघांचेही मृतदेह मिळवण्याचा भारत सरकारने भापूर प्रयत्न केला. मात्र सौदी कायदा याची परवानगी देत नसल्यामुळे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound