वाळूची अवैध करणारे दोन ट्रॅक्टर जप्त; तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव परिसरात विनापरवाना अवैधरित्या गौण खनिजची चोरटी वाहतूक करताना तहसीलदार यांनी केलेल्या कारवाईत दोन ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आलेले आहे.

या संदर्भात महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक ८ जुन२०२४ शनिवार रोजी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल चोपडा रोडवर किनगाव गावाजवळ यावल शहर तलाठी ईश्र्वर कोळी, डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी, कोळवद तलाठी राजु बोरटे, आडगाव तलाठी श्वेता ससाने, तहसीलदारांचे वाहनचालक अरविंद बोरसे यांच्या नेतृत्वातील गस्ती पथकाने गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर धडक कारवाई करीत विनापरवाना अवैधरित्या वाळूची विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर मध्ये चोरटी वाहतुक करतांना आढळून आले असुन, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी कारवाई करीत जप्त केली असुन दोन्ही वाहनांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त मिळाल्याची आहे. महसुल प्रशासनाने केलेल्या या वाळूमाफीया विरूद्धच्या धडक कारवाईमुळे वाळु माफीयामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे .

Protected Content