ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा कारागृहात दोन गटात तुफान दगडफेक; एक गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील जिल्हा कारागृह येथे बंदिवान कायद्यांच्या दोन गटात गटांमध्ये तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी १० वाजेच्या सुमारास घडली आहे यात एक जण गंभीर जखमी तर इतर किरकोळ  जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्हा कारागृह बॅरिकेट क्रमांक १ ते ४आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (वय 30 रा. सबजेल जळगाव) हा बंदीवान कैदी हे जखमी झाले आहे तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. हा वाद कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती अद्यापसमोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह किंवा जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे.

Protected Content