जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात एकमेकांना धारदार शस्त्राने वार केल्यने तीन जण गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात दोन्ही गटातील एकुण १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून, पहिल्या गटातील सुप्रिया सोपान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता गावात जुन्या वादातून त्यांचा दीर योगेश शांताराम पाटील याला गावातील घनशाम धर्मराज पाटील, सचिन घनशाम पाटील, प्रदीम घनश्याम पाटील आणि सुनिता घनश्याम पाटील यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी प्रदीप पाटील याने हातातील धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी सुप्रिया पाटील व त्यांचे नातेवाईक समाधान शांताराम पाटील गेले असता त्यांना देखील मारहाण केल्याचे नमूद केले आहे.
तर दुसऱ्या गटातील घनश्याम धर्मराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश शांताराम पाटील व त्याचे नातेवाईक गोपाल भावलाल पाटील, सोपान सुभाष पाटील, समाधान शांताराम पाटील, किरण विक्रम पाटील, नवल पंडीत पाटील, गोपाल पंडीत पाटील, अरूण मंगल पाटील, इंदुबाई सुभाष पाटील, सुप्रिया सोपान पाटील, मिनाबाई नवल पाटील, सिंधुबाई शांताराम पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जळगाव यांनी चहाच्या दुकानावर दगडफेक केली तर इतरांनी कुऱ्हाड, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने घनश्याम पाटील व त्यांचा मुलगा सचिन पाटील याला बेदम मारहाण करून दुखापत असे नमूद केले आहे. त्यावरून दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या गटातील घनशाम धर्मराज पाटील, सचिन घनशाम पाटील, प्रदीम घनश्याम पाटील आणि सुनिता घनश्याम पाटील सर्व रा. आव्हाणे तर दुसऱ्या गटातील योगेश शांताराम पाटील, गोपाल भावलाल पाटील, सोपान सुभाष पाटील, समाधान शांताराम पाटील, किरण विक्रम पाटील, नवल पंडीत पाटील, गोपाल पंडीत पाटील, अरूण मंगल पाटील, इंदुबाई सुभाष पाटील, सुप्रिया सोपान पाटील, मिनाबाई नवल पाटील, सिंधुबाई शांताराम पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जळगाव असे एकुण १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.