अमळनेरात दोन दिवसीय अभ्यास वर्ग उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी । अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संचलीत एन मुक्ता या प्राध्यापक संघटनेचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग उच्च शिक्षणातील शिक्षकाची भुमिका या विषयावर प्रताप तत्वज्ञान केंद्रात दोन दिवसीय अभ्यास वर्ग पार पडला.

या वर्गाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील पदाधिकारी, व सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते. अभ्यास वर्गाचे उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर वर्गाचे उदघाटक व विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील, तसेच अध्यक्ष स्थानी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. नितीन बारी, प्रमुख अतिथी खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक, संघटनेचे सचिव प्रा. डाँ अविनाश बडगुजर, जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. प्रा. सौ. प्रज्ञा जंगले, सचिव प्रा. डाँ धनंजय चौधरी, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी पाटील, सचिव प्रा डाँ गजानन पाटील, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा. डाँ. धामणे, तसेच कार्यकमास तत्वज्ञान केंद मानद संचालक व माजी प्राचार्य डॉ. एस आर चौधरी, प्राचार्य डॉ. सुर्यवंशी, प्राचार्य डाँ पी. एस सोनवणे व संघटनेचे विविध महाविद्यालयातून आलेले पदाधिकारी, सदस्य प्रतिनिधी प्राध्यापक बंधु भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. अविनाश बडगुजर, सूत्रसंचलन प्रा. डॉ. पवन पाटील तर आभार प्रा. डाँ मनिष करंजे यांनी मानले.

उदघाटन प्रसंगी दिलीप पाटील यांनी आपले जीवन जगताना पैसा बुद्धी सोबत तत्वही सोबत असावे आपले कार्य हे ईश्‍वरिय असावे कारण शैक्षणिक परिवर्तनातून समाज परिवर्तन होते.आपल्याला हक्क सांगण्यासाठी सर्वप्रथम विद्यापीठ कायदा व विद्यापीठचा पर्स्पेक्टिव प्लान व वाचन अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपान केले. निरज अग्रवाल यांनी वर्गातील विद्यार्थीची अनुपस्थिती अत्यंत महत्वाची समस्या आहे म्हणून आपली भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन केले. नितीन बारी यांनी सर्व समस्याचा आढावा घेतला त्यात परकीय संस्कार न स्वीकारता भारतीय संस्कारी पीढ़ी घडवण्यासाठी प्राध्यापक यांची भूमिका मांडली तसेच शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्राध्यापकांनी प्रयत्न करावा अशी भूमिका मांडली
यासोबत प्राध्यापकांनी विविध शैक्षणिक विषयावर सकारात्मक चर्चा केली. यशस्वीतेसाठी अमळनेर विभागातील सर्व पदाधिकारींनी सहकार्य केले.

Add Comment

Protected Content