पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा- भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आ. किशोर पाटील यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला असून मा. दादा भुसे यांच्या दालनात वारंवार बैठका घेऊन मतदार संघातील विकास कामांचे गांभीर्या लक्ष्यात आणून दिले. यावर दादा भुसे यांनी तातडीने निर्णय घेत मूलभूत योजनेअंतर्गत सर्वांगीण विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजुर केले असून त्यास शासकीय मान्यता मिळाली. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बु. नवेगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लक्ष तर रस्त्याची सुधारणेसाठी १० लक्ष, नागरदेवळा येथील महाराणा प्रताप चौक ते निपाणेकडे जाणारा प्रभाग क्र. १ मधील रस्तेचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष,
शिंदाड येथे पाईप मोरी फारशीपुल बांधकामांसाठी ६ लक्ष, सार्वे बु.प्र.प्रा.(सातगाव डोंगरी) येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लक्ष, पिंपरी खु.प्र.प्रा.येथे रस्ताचे काँक्रिटीकरणासाठी ५ लक्ष, वाडीतील रस्ता काँक्रिटीकरण ३ लक्ष, विष्णूनगर तांडा येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष, हनुमानवादी येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, वरसाडे तांडा नं. १ येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, वरसाडे तांडा नं. २ येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, वरसाडे तांडा नं. ३ येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, हनुमानवाडी येथे सभागृह बांधकामासाठी ७ लक्ष, सातगाव डोंगरी तांडा येथे रस्ता काँक्रिटीकरण ३ लक्ष, पिंपळगाव तांडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ३ लक्ष, पिंपळगाव खु.प्र.पा. येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३ लक्ष, माहिजी येथे सभागृह बांधकामा करणे ७ लक्ष, सांगवी (नागरदेवळा) येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ३ लक्ष, विष्णूनगर तांडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ३ लक्ष, नगरदेवळा सिम येथे सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, नगरदेवळा येथे दरवाजा ते सेंट्रल बँक रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, लोहटा रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, तारखेडा खु. येथे मशिदीपासून ते मराठे मंगल कार्यालयाकडे रस्ताचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, वरखेडी येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, बाळद येथे रस्ताकाँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष असे पाचोरा तालुक्यासाठी निधी मंजुर झाला आहे.
याचबरोबर, भडगाव तालुक्यातील भोरटेक सिटी नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, भोरटेक भिल्ल वस्ती चंदनपुरी येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, तांदुळवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, रोकडा फार्म येथे रस्ता काँक्रिटीकरण ३ लक्ष, नालबंदी गावातील रस्ता काँक्रिटीकरण ४ लक्ष, बोरनार भराडी वस्तीतील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ३ लक्ष, कोठली भराडी वस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ३ लक्ष, रोकडा फार्म भराडी वस्तीतील रस्ता काँक्रिटीकरण करणे ३ लक्ष, गोंडगाव (दलवाडे) भराडी वस्ती रस्ता काँक्रिटीकरण ३ लक्ष, गुढे भराडी वस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण ३ लक्ष, गुढे येथे स्मशानभूमीत सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, बाम्बरूळ पाटस्थळ प्र.भ. येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ३ लक्ष, मळगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ३ लक्ष, वडगाव सतीचे येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लक्ष, शिंदी येथे सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, शिंदी भिल्लवस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण ३ लक्ष, घुसर्डी येथे स्मशानभूमी बांधकाम करणे ५ लक्ष असे भडगावातील कामांसाठी निधी मंजुर झाला आहे.
पाचोरा – भडगाव तालुक्यातील ४३ गावांना मूलभूत सुविधा अंतर्गत २ कोटी रुपये निधी मिळण्यास यश प्राप्त झाले आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे आ. किशोर पाटील यांनी मा.ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तथा मा.ना.दादा भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांचे शतशः आभार व्यक्त केले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी आ.पाटील यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.