भाजपा कार्यालयात तीन राज्यांमधील विजयाचा जल्लोष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये दणदणीत विजय मिळवल्याचा आनंदोत्सव येथील जिल्हा भाजप कार्यालयात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे या विजयाचा आनंदोत्सव ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून व मिठाई वाटून आज जिल्हा भाजपा कार्यालय वसंत स्मृती भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह  जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर  जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, संघटन सरचिटणीस अरविंद देशमुख, माजी उपमहापौर डॉ .अश्विन सोनवणे, अजय गांधी, महेश जोशी, रोहित निकम, माजी नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला काळे, दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, भाग्यश्री चौधरी, आनंद सपकाळे, राहुल पाटील, राजू मराठे, प्रकाश बालानी, यशवंत पाटील, कैलास सोमानी, अमित देशपांडे, शक्ती महाजन, चेतन शर्मा, धीरज वर्मा, राहुल मिस्त्री, अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश चौधरी, मुकुंद मेटकर, अतुल बारी, अमय राणे, क्षितिज भालेराव, मुकुंदा सोनवणे, केशव नारखेडे, उदय भालेराव, प्रल्हाद सोनवणे, अशोक राठी, प्रकाश पंडित, दिलीप नाझरकर, अनिल जोशी, विजय राजपूत पाटील, राहुल पाटील, दीपक कोळी, ललित बडगुजर, जयंत चव्हाण, अरुण श्रीखंडे, प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Protected Content