चोरीच्या तयारीत असणारे अट्टल गुन्हेगार गजाआड

bhusawal don aaropi

भुसावळ प्रतिनिधी । चोरीच्या तयारीत असणार्‍या दोन अट्टल गुन्हेगारांना बाजारपेठ पोलीसांच्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.

याबाबत वृत्त असे की, पोलीस निरिक्षक देविदास पवार, सहा.फौ तस्लीम पठान, पो.हे.काँ सुनिल जोशी, जयेंद्र पगारे पो.ना.दिपक जाधव, रमण सुरळकर पो.काँ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, दिपक पाटील यांचे पथक रात्री गस्त घालत असतांना त्यांना माहीती मिळाली की दिनदयाल नगर भागातील राहणार हदपार व अट्टल गुन्हेगार शेख कलीम हा त्याच्या साथीदारासह तयारीत आहे. हे दोन्ही संकटमोचन वीर हनुमान गल्ली, गडकरी नगर भागात रात्रीच्या वेळी घरफोडी किवा चोरी सारख्या गुन्हा करण्याच्या तयारीने दुचाकीवरून आले असल्याचे या पथकाला कळले. या अनुषंगाने या दोन्ही चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पो.ना.रमण सुरळकर, पो.काँ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख यांनी शेख कलीम शेख सलीम (वय- २७ रा. दिनदयाल नगर जामनेर रोड भुसावळ) तसेच सतिश (उर्फ) बाबु नरेश आडेकर (वय- २४ रा.दिनदयाल नगर जामनेर रोड भुसावळ) या दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ टिव्हीएस ज्युपिटर ही दुचाकी, १२ इंच लांबीचा स्क्रु ड्रायव्हर; तीन फुट लांबीची लोखंडी टॉमी आणि फायटर आढळून आले. या अनुषंगाने या दोन्ही आरोपींविरूध्द भाग ५ गु.र.न ३९६/१९ भा.द.वि कलम ४०१,३४ मु.पो.अँक्ट १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास पो.हे.काँ जयेंद्र पगारे करीत आहेत. शेख कलीम हा बाजारपेठे पोलीस स्थानकाच्या रेकॉर्ड वरील व अट्टल गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध भु.बा.पेठ पो.स्टे ला (चोरी, घरफोडी, मर्डर) या सारखे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. तसेच त्याला हदपार ही करण्यात आले आहे.

दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले व उप.पो.अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक सो देविदास पवार, सहा.फौ तस्लीम पठान पो.हे.काँ सुनिल जोशी, जयेंद्र पगारे पो.ना.दिपक जाधव, रमण सुरळकर पो.काँ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, दिपक पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content