वसई येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वसईतील फादरवाडी येथील खदानीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध सुरू आहे.

वसई पूर्वेतील फादरवाडी येथील खाणीच्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी माती काढताना हे खड्डे तयार झाले. शनिवारी दुपारी परिसरातील काही मुले या पाण्यात पोहण्यासाठी गेली. मात्र काही मुले बुडाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. स्थानिक लोकांनी अमित सूर्यवंशी (11) आणि अभिषेक शर्मा (13) या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. आणखी 3 मुले बुडाल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे. वसई विरार अग्निशमन दल इतर मुलांचा शोध घेत आहे. अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले की, अजूनही शोध सुरू आहे कारण स्थानिक लोकांनी आणखी 3 मुले बुडाली असण्याची शक्यता आहे. इतर मुलेही पळून गेली असावीत, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Protected Content