दोन भावांना काहीही कारण नसतांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथे कारण नसतांना एका तरूणासह त्याच्या भावाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनीवार १४ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, विजय नारायण इंगळे (वय*-३४) रा. के.सी.पार्क, कानळदा रोड, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे अशोक ठोसर आणि त्यांचा मुलगा व मुलगी याच्यासह १० ते १२ जणांनी काहीही कारण नसतांना विजय इंगळे व त्याचा भाऊ यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली.

तसेच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विजय इंगळे यांनी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक ठोसर, त्याचा मुलगा आणि मुलगी तसेच अनोखळी १० ते १२ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Protected Content