जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सागर संजय नागपूरे व आकाश संजय नागपुरे या दोघ भावंडांवर संशयित कुणाला मुरलीधर आस्वार व हेमंत मुरलीधर आस्वार (दोघ रा. शिरसोली, प्र.न, ता. जळगाव) यांनी वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शिरसोली येथील बस स्टॅण्डजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी वाड्यातील दुर्गादेवी मंदिराजवळ सागर संजय नागपूरे हा तरुण वास्तव्यास आहे. मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावातील बस स्टॅण्डजवळील चहाच्या दुकानाजवळ कुणाल आस्वार व हेमंत आस्वार हे काही जणांसोबत वाद घातली होते. त्यावेळी सागर नागपूरे व त्यांचा भाऊ आकश नागपूरे हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी दोघांनी कशाने तरी सागर यांच्या कपाळावर वार केला तर हेमंत याने त्याच्या हातातील कैचीने आकाशच्या पोटावर वार करुन गंभीर जखमी केले. त्या दोघांवर रुग्णालयता उपचार सुरु आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ अधिकार पाटील करीत आहे.