चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात दोन दुचाकीच्या अपघातात दोघे भाऊ गंभीर जखमी झाल्याची बुधवारी २७ मार्च रोजी मध्यरात्री घटना घडली आहे. याप्रकरणी चौकशीअंती अखेर शनिवारी ३० मार्च रोजी रात्री ८.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुरेश पवार वय ३१ रा. शिवाजी चौक हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २७ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संदीप पवार हे त्यांचे लहान भाऊ धनंजय सुरेश पवार यांच्या सोबत चाळीसगाव रेल्वेस्टेशनकडून सिग्नल चौकातून दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएम ४०५५) ने जात अहोते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईजे ६६८६) ने जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप पवार व त्याचा भाऊ धनंजय पवार हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक हा दुचाकी घेवून पसार झाला. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दोघांवर उपचार करण्यात आले. याप्रकरणी चौकशी अंती शनीवार ३० मार्च रोजी रात्री ८.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजय मालचे हे करीत आहे.