Home क्राईम जळगावात पानटपरीधारकाकडून दोघांना मारहाण; शहर पोलीसात गुन्हा

जळगावात पानटपरीधारकाकडून दोघांना मारहाण; शहर पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । कामानिमित्त गावात आलेल्या तरूणाला किरकोळ कारणावरून पानटपरीधारकाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी ११ वाजता शहरातील गोलाणी मार्केटजवळील एअरेटेल ऑफीसजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, भुषण ज्ञानेश्वर बागुले (वय-२५) रा. गुरेगावले ता. चोपडा ह.मु. भाईटे नगर तरूण सध्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत  असल्यामुळे काका नरेंद्र बागुले यांच्याकडे राहतो. आज बुधवारी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरातील गोलाणी मार्केटमधील ऐअरटेल मोबाईल शोरूममध्ये कामासाठी चुलत भाऊ हर्षल बागुले याच्यासह आले. काम आटोपून जात असतांना बाजूच्या पानटपरीवर इलायची पुडी घेण्यासाठी आला. या ठिकाणी पैसे घेण्याच्या वादातून पानटपरीधारक प्रविण रमेश कोळी (वय-२५) रा. वाल्मिक नगर याने भुषण व हर्षलला शिवीगाळ करून मारहाण केली. खिश्यातील ७०० रूपये बजरी हिसकावून घेतले. भुषण बागुले याच्या फिर्यादीवरून शह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे. 


Previous article12 मंत्र्यांना हटवलं
Next articleगिरीश चौधरींना 5 दिवसांची ईडी कोठडी
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound