जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीची दुचाकी घेवून फिरणार्या दोन चोरट्यांच्या एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अजिंठा चौफुली परिसरात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा रा. गांधी नगर व शुभम सुनिल पाटील रा. कन्हाळा रोड घोडेपीरबाबा जवळ भुसावळ हे दोघ विनाक्रमांकाची दुचाकी घेवून संशयास्पदरित्या फिरतांना पथकाला दिले. त्यांची त्या दोघांची विचारपूस करुन त्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली. परंतु त्यांच्याकडे दुचाकीचे कागदपत्रे नसल्याने पथकाने त्या दोघांना पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी ही दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, विकास सातदिवे, किशोर पाटील यांच्या पथकाने केली. दोघ संशयितांची पोलिसांची कसून चौकशी केली असता, ते दोघ सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी चोरीच्या तीन दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. दरम्यान, भुसावळ येथे त्यांनी अनेक गुन्हे केले असून त्यांच्याकडून अजून काही उघडकीस येण्याची शक्यता आहे.