खोट्या सह्या करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या दोघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी । येथील इंडसइंड बँक मधून १३ लोकांचा डाऊन पेमेंट घेऊन त्यांच्या नावे कर्ज मंजूर करून बँकेत न भरता खोट्या सह्या करून फसवणूक केल्यामुळे दोघांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी चंद्रकांत अशोक चौधरी ( वय ३५ राहणार विठोबा नगर, कालिका माता मंदिराजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वसीम हमीद शेख (वय ३३ राहणार काझी प्लॉट) व कुणाल प्रकाश अहिरे (वय ३४ राहणार रेल्वे हॉस्पिटल च्या मागे समता नगर भुसावळ) यांनी शहरातील १३ लोकांकडून ६,०४,००० रोख व दस्तावेज घेतली होती. यानंतर २,८७,४६५ डाऊन पेमेंट घेऊन इंडसइंड बँके शाखा भुसावळात येथे जमा करून ग्राहकांकडून घेतलेल्या दस्ताऐवजाणवर खोट्या सह्या करून ग्राहकांचे नावे एकूण ८३२,४०० रुपये वाहन कर्ज म्हणून मंजूर करून घेतले. याला इंडसइंड बँक भुसावळ शाखेत मध्ये जमा न करता खोट्या स्वाक्षर्‍या करून याला काढून घेतली. या प्रकरणात १३ ग्राहकांची फसवणूक करून १४,३६,४०० अपहार केल्यामुळे शहर पोलीस स्टेशनला दिनांक १९ मे रोजी गुरुन ११२/१९ भादवी कलम ४२०,४०८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपीना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोहम्मद अली सैय्यद अली करीत आहेत.

Add Comment

Protected Content