जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षाकरीता हद्दपार असलेला महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) तर बाजारपेठेत चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्या संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) या दोघांवर कारवाई करीत जेरबंद केले. ही कारवाई शनिपेठ पोलिसांनी केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खून, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्ह्यातील संशयित असलेल्या महेंद्र उर्फ लहाण्या महाजन याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. हा हद्दपार असलेला संशयित रथ चौकात फिरत असल्याचे माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच कर्तव्यावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने हद्दपार महेंद्र महाजन याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेशोत्सवाच्या अगमनाच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या शनिपेठ पोलिसांना भिलपुरा ते घाणेकर चौक दरम्यान, संशयित संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथगल्ली, तांबापुर) हा चॉपर घेवून दहशत माजवित होता. शनिपेठ पोलिसांनी त्याच्या आवळून त्याच्याकडून धारदार चॉपर हस्तगत केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे




