Home क्राईम दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

0
100

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दुचाकी चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन चोरट्यांना भिलपुरा चौकातून मंगळवारी १४ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दीपक दयाराम रुम (वय-३४) आणि दीपक एकनाथ शेले (वय- ३१), हे दोघेही रेणुकानगर असे अटक केलेल्या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत.

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील सहाजीद हबीब खाटीक (वय२४) यांची ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ एआर ५३४७) ही चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, दीपक रुम आणि दीपक शेले यांना भिलपुरा चौकातून मंगळवारी १४ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता कारवाई अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोकॉ गणेश ठाकरे, अफजल बागवान आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोकॉ अनिल कांबळे आणि पराग दुसाने यांनी कारवाई केली आहे.


Protected Content

Play sound