Home क्राईम दुदैवी घटना : पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू; एमआयडीसीत नोंद

दुदैवी घटना : पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू; एमआयडीसीत नोंद

0
156


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील ५५ वर्षीय महिला हे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १५ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. सीताबाई मिस्तरीय बारेला वय-५५ रा. म्हसावद ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात ५५ वर्षीय सीताबाई बारेला या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. दरम्यान दुपारी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे घटना उघडकीला आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बाहेर काढून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंतिम मयत घोषित केले आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound