Home क्राईम गळा चिरून तरूणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक; एमआयडीसी पोलीसांनी कारवाई

गळा चिरून तरूणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक; एमआयडीसी पोलीसांनी कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जून्या वादातून तरूणाचा गळा चिरून खून केल्यानंतर मारेकरी पसार झाले होते. यातील एका संशयिताला नंदूरबार येथून अटक केल्यानंतर दुसरा संशयित अशोक महादू राठोड (वय ३२, रा. झाकीर हुसेन कॉलनी, संत गाडगेबाबा चौक) याला नेपानगर येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा देखील शोध घेतला जात असून पथक त्यांच्या मागावर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील समता नगरातील अरुण सोनवणे या तरुणाला टोळक्याने चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करुन निर्घुण खून करीत मारेकरी तेथून पसार झाले होते. दरम्यान, एलसीबीचे तीन पथकांकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. मारेकऱ्यांपैकी एक संशयित सोनू आढाळे याच्या एलसीबीच्या पथकाने नंदूरबारमधील विसरवाडी येथून मुसक्या आवळल्या होत्या. तर त्यांच्या इतर साथीदारांचा देखील शोध घेतला जात होता. खूनाच्या गुन्ह्यातील दुसरा संशयित अशोक राठोड हा मध्यप्रदेशातील नेपानगर येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

या पथकाने केली कारवाई
सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हेमंत कळस्कर व विजय जाधव यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयिताच्या नेपानगर येथून अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा देखील शोध घेतला जात आहे.


Protected Content

Play sound