नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्याच्यावरून बीटकॉईनच्या संदर्भात खोडसाळपणाचा मॅसेज टाकण्यात आल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
रविवारी पहाटेच्या सुमारास म्हणजेच २ वाजून ११ मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं. यानंतर लागलीच यावरून भारतानं रितसर बिटक्वाईन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि सरकार ५०० बीटीसी खरेदी करुन लोकांना वाटत आहे असे ट्विट करण्यात आले. दोन मिनिटानंतर हे ट्विट डिलिट केलं गेलं. नंतर पुन्हा २ वाजून १४ मिनिटांनी पुन्हा ट्विट केलं गेलं. ज्यात पुन्हा आधीचाच मजकूर होता. पुन्हा हे बेकायदेशीर ट्विटही डिलिट केलं गेलं.
पंतप्रधान मोदींचं ट्विटर हँडल हॅक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली. त्यातही बिटकॉन्सच्या संदर्भात आधीच गोंधळ आहे. हॅकर्सच्या ट्विटनं त्यात आणखी भर पडली. पंतप्रधान कार्यालयानं नंतर रितसर ट्विट करत माहिती दिली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड केली गेली होती जी तात्काळ दुरुस्त करत सुरक्षित केली गेली. याची माहितीही ट्विटरला दिली गेलीय. ज्या काळात ट्विटर अकाऊंटमध्ये गडबड केली गेली, त्याकाळात केल्या गेलेल्या ट्विटसला दूर्लक्ष करा. असे पीएमओतर्फे जाहीर करण्यात आले आहे.