जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर शिवारात शेतात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज २७ सप्टेबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
सोनाली राजेंद्र बारेला (वय-१३) रा. विटनेर ता. जि.जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील तरूणी विटनेर शिवारातील शेतात आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. आज २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळली त्यात तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रविंद्र भिमसिंग बारेला यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. त्याच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विटनेर पोलिस पाटील डॉ.साहेबराव धुमाळ यांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे.