तुकाराम महाराजांचे अभंग शाश्‍वत : पंतप्रधान

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संत तुकाराम महाराज यांचे अभंग हे शाश्‍वत असून त्यांनी राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते आपल्याला प्रेरणा दिली आहे. सावरकर यांची प्रेरणा देखील अभंगच असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहू येथे शिळा मंदिराचे लोकार्पण केले. यानंतरच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. विशेष करून त्यांनी संत तुकाराम यांचे अभंग हे आजवरच्या सर्व पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्कारक्षम असल्याचे प्रतिपादन केले. पंतप्रधान म्हणाले की, आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. देहूतील संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर सांस्कृतिक भविष्य घडवणारं मंदिर आहे. हे एक संस्कार पीठ असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा ते बेड्यांच्या चिपळ्या करून तुकाराम महाराजांचे अभंग तुरुंगात म्हणत असत असे पंतप्रधान म्हणाले.

 

Protected Content