घरात घसून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारे ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी संदीप लखीचंद बनवे (वय-३८)  हा तरुण ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्यावर अतिप्रसंग करत जबरदस्ती प्रयत्न करू लागला. तिने हटकले असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला धमकी दिली. याप्रकरणी महिलांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी संदीप लखींचेद बनवे  याच्या विरोधात तक्रार दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहेत.

 

Protected Content