Home क्राईम साखर वाहून नेणारा ट्रक उलटला : एक जण जखमी !

साखर वाहून नेणारा ट्रक उलटला : एक जण जखमी !

0
113

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साखर वाहून नेणारा ट्रक अचानक उलटून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पहूर ते जामनेर रोडवर काल दुपारी अपघात घडला. यात एमपी 09 -0446 या क्रमांकाच्या ट्रकमधून साखरचे पोते भरून ती पहूरच्या दिशेने ट्रक निघाला होता. सोनाळा फाट्याजवळ हा ट्रक अचानक उलटला. या अपघातात वसीम खान मुस्तकीन खान ( वय 40, रा. खंडवा, मध्यप्रदेश ) हा ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी येथे धाव घेऊन ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, साखरने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पहूर ते जामनेरची वाहतूक ही बराच वेळ ठप्प झालेली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सुरू होते.


Protected Content

Play sound