मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराजवळून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक उलटून चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, महामार्गावर मलकापूर रोडवरील हॉटेल तिरंगाच्या जवळ रात्री अकराच्या सुमारास सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक अचानक उलटला. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लीनर हे दोन्ही ट्रकच्या खाली दाबले गेले असून यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी दबलेल्या दोन्ही जणांना ट्रकखालून काढून रूग्णालयात दाखल केले. या दोन्ही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. रात्री उशीरापर्यंत याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्याचे काम सुरू होते.