जळगाव प्रतिनिधी । त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात नुकताच “त्रिमूर्ती दांडिया महोत्सव’ उत्साहात पार पडला. नवरात्रोत्सवात सर्वत्र गरबा, दांडियाची धामधूम असल्याने महाविद्यालयातर्फे नवरात्रोत्सवानंतर शहरातील लेवा भवन येथे गरबा, दांडिया महोत्सव घेण्यात आला. यावेळी दांडिया किंग, दांडिया क्वीन, बेस्ट दांडिया कपल यासोबतच बेस्ट ड्रेससाठी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
लेवा भवन येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान दांडिया महोत्सव रंगला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ओढनी, चौगडा तारा, कंमरीया, तारा विना शाम ने…यांसह गरबा, दांडियाच्या एकापेक्षा एक बहारदार गीतांवर विद्यार्थ्यानी गरब्याच्या ताली खेळल्या. दिवसभर रंगलेल्या या कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थ्यानी मनसोक्त आनंद लुटला. सायंकाळी महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ एस.पी. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे मानद संचालक सुदीप राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दांडिया किंग म्हणून मोहम्मद उसामा तर दांडिया क्वीन म्हणून शुभांगी चौधरी यांना पारितोषीक देण्यात आले. दांडिया बेस्ट कपल म्हणून अस्मिता पाटील व रुपाली पाडवी यांना तर बेस्ट ड्रेसचे पारितोषिक राधिका बोरले व गायत्री पाटील यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य हर्षल तारे यांनी केले तर प्रा. अमोल चौधरी यांनी आभार मानले.