हातचालाखी! बाहेरगावच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भजे गल्लीत एका बाहेरगावाहून आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील राहणाऱ्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील वय-६० या महिला मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव शहरातील बसस्थानकावर उतरल्या. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्ती त्यांना भेटले व त्यांचा विश्वास संपादन करून करून त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र काढून हातात दिली. त्यानंतर ती सोन्याची पोट कागदा पुडी बांधुन ठेवली आहे असे सांगून त्यात दगड ठेवून पसार झाले. थोड्यावेळाने वृद्ध महिलेने ती कागदाची पुडी सोडल्यानंतर त्यात दगड निघाल्याने त्यांना धक्का बसला. दरम्यान या संदर्भात त्याने तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे..

Protected Content