भवरलालजी जैन यांना मनियार बिरादरी ,लायनेस क्लब व जैन स्पोर्टस ॲकॅडमीतर्फे श्रद्धांजली

जळगाव (प्रतिनिधी) डॉ भवरलालजी जैन यांच्या तृतीय श्रद्धा वंदन दिनानिमित्त कांताई सभागृहात आज जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी, लायनेस क्लब जळगाव व जैन स्पोर्टस ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पद्मश्री भवरलाल जैन यांच्या मातृशक्ती या कार्याबाबतची माहिती फारुक शेख यांनी सविस्तरपणे सांगितली.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पोलिस उपअधीक्षक (गृह) केशव पतोंड, लायनेसच्या विजया बाफना व स्नेहा नाईक, अंकुरच्या संगीता पाटील,पूनम पाटील, आशा चौधरी , ‘जाणीव’ च्या मनीषा बागुल, मानियार बिरादारीचे इस्माईल शेख, एडवोकेट आमिर शेख,अल्ताफ शेख, अब्दुल रऊफ रहीम , जैन स्पोर्ट्स चे प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी , शालिग्राम राणे,नरेंद्र चौहान यांच्यासह अण्णासाहेब जी.डी. बेंडाळेच्या डॉ अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम एच आय व्ही यांच्यासह जीवन जगणारे सुमारे २०० लहान मुलांना माननीय भवरलालजी जैन यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पित केली गेली. यावेळी फारुक शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजनाचा उद्देश सांगितला. विजया बाफना यांनी एचआयव्हीसह जगणार्‍या मुलांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले जीवन जगा, असे आव्हान केले. तर पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी कोणताही आजार हा बरा होऊ शकतो. त्यासाठी आपली कार्यशक्ती सकारात्मक असावी. समाजातील सर्व समूह तुम्हाला सहकार्य करण्यास तत्पर असल्याने, आपण या देशाच्या उन्नतीसाठी पुढे यावे, असे आव्हान केले व या १७५ मुलांना सकस आहाराचे पॅकेट सन्मानाने दिले. सकस आहार दिल्यानंतर मनियार बिरादरी व लायनेस क्लब दोघांनी या मुलांना कपडे तसेच महिलांना साडी उपलब्ध करून दिल्या नंतर सर्व मुलांसोबत बिरादरी चे पदाधिकारी यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

Add Comment

Protected Content