यावल प्रतिनिधी । मुंबईतील २६/११च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या शहिदांना शहरातील कर्तल सोसायटीच्यावतीने शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ जण मृत्यूमुखी पडले तर ३०० हून अधिक जण जखमी झाले आहे.
यावल शहरातील तरूण समाजकार्यात अग्रेसर असलेल्या युवकांनी स्थापन केलेल्या कर्तल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीतर्फे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कर्तल सोसायटीचे अध्यक्ष व समाज सेवक अश्फाक अब्दुल गफ्फार शाह, इंद्रिस खान, शेख असलम, शेख तहुर खान, शेख रिझवान, कल्लू भाई इस्माईल खान, हकीम खान, रेहान खान, अझहर खान यांच्यासह स्थानिक रहिवासीसह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.