Home Cities चोपडा वैजापूर बलात्कारप्रकरणी आदिवासी विद्यार्थी परिषदेतर्फे जनआक्रोश मोर्चा (व्हिडीओ)

वैजापूर बलात्कारप्रकरणी आदिवासी विद्यार्थी परिषदेतर्फे जनआक्रोश मोर्चा (व्हिडीओ)

0
111


aadivasi morcha

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील वैजापूर येथील एकाच कुटुंबातील दोन पाचवर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलींवर गावातीलच देवेंद्र मोरे या नराधमाने पाशवी
अत्याचार केला. अशा नराधमांना अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आदिवासी विद्यार्थी परिषदेने जनआक्रोश मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

यावेळी परिषदेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित मुलींना व कटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा, आरोपीवर अट्रासिटी नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, सदर खटल्यात जीवे मारण्याचा तसेच अपहरणाचा प्रयत्न व इतर कलमांचा समावेश करण्यात यावा, दोन्ही पीडितांना मनोधर्य योजनेअंतर्गत
समाजकल्याण विभागाकडून तात्काळ लाभ मिळावा व दोन्ही पीडित मुलींच्या शिक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

 


Protected Content

Play sound