बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड विधीसेवा प्राधिकरणाचा व बोदवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथील आदिवासी वस्तीत जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ॲड. अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ यांनी वरील प्रतिपादन केले की, निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो. दुर्गम डोंगरी जंगलात वास्तव्य करणाऱ्या दुर्लक्षित आदिवासी समाजाकडे तसेच एक महत्वाच्या समूहाकडे आणि परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष केले त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन जाहीर केले.
सदर दिवस हा आदिवासी यांच्या न्याय हक्कासाठी जागृती निर्माण करणारा दिवस आहे. आदिवासी संस्कृती व परंपरा, कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात व्हावी, समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा, निसर्गाशी नाते अतूट ठेवत आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन समाज विकास घडवा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर, दऱ्या-खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, या उद्देशाने हा जागतिक आदिवासी दिन दिवस म्हणून साजरा करण्यात येत. यावेळी आदिवासी समाजासाठी असणारे कायदे व त्यांचे न्याय हक्क व शासनाच्या त्याच्यासाठी असणाऱ्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी हे होते. बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, सचिव ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड.के.एस इंगळे, ॲड. किशोर महाजन, यांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायालयीन अधिक्षक वैभव तरटे, विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील, अविनाश राठोड यांनी परीश्रम घेतले. सदर कार्यक्रमास तालुक्यासह परिसरातील नागरीक व वकील बांधव , आदिवासी बांधव मोठ्या संख्येने हे उपस्थित होते.तर केस वॉच राजेश महाजन, प्रदीप चव्हाण यांनी पोलीस बंदोस्त ठेवला.