वरणगावात साडे तेरा कोटींच्या पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार : कॉंग्रेस

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात साडे तेरा कोटींची पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून हे योजनेचे पाप झाकण्यासाठी नविन योजनेच्या माध्यमातून आंदोलन करत वरणगांव वासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतआहे. तरी या योजनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून नगर परिषदचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले की ,ही योजना लोकांच्या पैशामधून बनविलेली आहे शासनाचे पैसे खर्च झालेले आहे हि साडे तेरा कोटीची योजना फेल झालेली आहे .नेहमी पाईपलाईनला गळती लागलेली असते . नवीन पाणीपुरवठा योजना हे सुरू व्हायला पाहिजे परंतु जुनी साडेतेरा कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचे स्पेशल ऑडिट झालेच पाहिजे लोकांची दिशाभूल करणे थांबले नाही तर काँग्रेस पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही असे निवेदन वरणगाव नगरपरिषद चे मुख्याधिकारी समीर शेख यांना देण्यात आले यावेळीकाँग्रेस पार्टीचे भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील ,शैलेश बोदडे , कल्पना तायडे ,कॉग्रेस पार्टी वरणगाव शहराध्यक्ष अशपाक काजी, मनोज देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content