यावल प्रतिनिधी । मालोद जवळील ईचखेडा येथील आदिवासी भिल्ल पाडा व जि.प. शाळेतील परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच झाला आहे.
यावेळी आदिवासी भिल्ल महिला मराबाई भिल्ल म्हणाल्या, आमच्या आयुष्यात आतापर्यंत कधीच झाडे लावली नाहीत. कारण आम्ही झाडांच्या सहवासातच राहत आलो आहोत. पण आता झाडांची जाणीव होऊ लागली आहे. झाडे नष्ट झाल्यामुळे आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचे झरे बंद झाले त्यामुळे पाण्याची समस्या, औषधी वनस्पती नष्ट झाल्यामुळे औषधी वनस्पतींची समस्या झाली. गर्द सावली देणारी झाडे नष्ट झाली. सावलीचे समस्या अश्या अनेक समस्या संकटे निर्माण झालीत. आज आम्हाला विशेष आनंद होत आहे. आमच्याकडून वृक्षारोपण करून घेत आहेत. अशा या कार्यक्रमाचा हा आमच्यासाठी पहिलाच प्रसंग आहे.या कार्यक्रम प्रसंगी आमचा फोटो काढला जात आहे. याचे आम्हाला खूप विशेष आनंद होत आहे.
वृक्षतोड संदर्भातील बद्दलचा गैरसमज या निमित्ताने दूर होईल असे मत ही मराबाई भिल यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी महिला पर्यावरण सखी म्हणजे राज्य समन्वयक नाना पाटील यांनी मार्गदर्शन करताना वृक्ष संवर्धन व संगोपनाचे कार्य माता-भगिनी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याचप्रमाणे रानभाज्या व औषधी वृक्ष चे उपयोग ही त्यां सांगू शकतात. आदिवासी पाड्यावर जाऊन त्या. वस्तीत वृक्षारोपान करून वृक्षांविषयी जाणीव करून देणे वृक्ष निसर्ग हे देवच आहे असे सांगून आदिवासी बांधव हे निसर्ग पूजक आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्यामुळे या आदिवासी बांधव कोरोना सारखे आजारापासूनह दूरच राहिले याला कारण येथील शुद्ध हवा , शुद्ध पर्यावरण हे होय असे प्रतिपादन नाना पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रेरणा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाला तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष संदीप पाटील, सरचिटणीस अजित तडवी, सुरेंद्र सिंग पाटील, मनोज पाटील, अशोक धनगर, मच्छिंद्र पाटील, अकबर तडवी, सुभान तडवी तसेच पाड्यावरील सुरभी बारेला, बशा बाई बारेला, गमती भिल , अंबीबाई भिल, बेबी बारेला ,गुलाबी बारेला, लाडी भिल ,जमुना भिल, सरसती भिल त्याचप्रमाणे गावातील बाळ गोपाळ नागरिकांच्या हस्ते ही विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील तर आभार मनोज पाटील या शिक्षकांनी केले.