रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गंगापूरी या आदिवासी भागातील अभयारण्यात नुकतीच वन विभागातर्फे वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, ‘एकच लक्ष, 33 कोटी वृक्ष’ या लागवड मोहीमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या वृक्षाची लागवड करण्यात येत असून पाडळे गावापासून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
गंगापूरी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एकच लक्ष, 33 कोटी वृक्ष’ या लागवड मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच सरपंच रजिया तडवी,जानकीराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच,शाहारमुक्त तडवी,फकीरा तडवी,वन समिती अध्यक्ष यूनुस तडवी,पोलिस पाटील जगनाथ पाटील, किशोर चौधरी, ग्रामसेवक एस.के.महाजन, वनपाल अतुल तायडे, वनरक्षक हरिष थोरात, वनरक्षक, सविता वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी उपस्थित होते.