महाराष्ट्रात 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागेल : गिरीश महाजन

Girish

 

नाशिक (वृत्तसंस्था) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागेल, असा अंदाज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविला आहे. नाशिकमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाजन बोलत होते. तर 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक होईल,असे असे भाकीतही ना. महाजन यांनी वर्तवले आहे.

 

गिरीश महाजन म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेनूसार मी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी पिंपरी येथील एका कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकीत केले होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा दिल्या. महाजन यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 50 आमदारांचा आकडा पार करुन दाखवावा, असे अव्हानही दिले आहे. दरम्यान, याआधी पिंपरी येथील एका कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकीत केले होते.

Protected Content