जळगाव प्रतिनिधी । येथील ‘गर्दीश ग्रुप’तर्फे शहरात वृक्षारोपण करण्यात आले असून वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला आहे.
गर्दीश ग्रुपने शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प केला असून याचा प्रारंभ दिलीप सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी सागर सपकाळे, मुकेश कामठे, विशाल सपकाळे, विकी डोंगरे, सोनू सूर्यवंशी, चिराग लढे, जितू भालेराव, धीरज खंबायत, दिनू भालेराव, विशाल सगळगीळे, सौरभ सगळगीळे,जितू सैंदाणे, सिधु सैंदाणे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. जळगावातील प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करावे असे आवाहन गर्दीश ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.