आरबीएसकेच्या पथकाची अपघातग्रस्त महिलेस मदत

medical assistance

पाचोरा प्रतिनिधी । अपघातानंतर रस्त्यावर विव्हळणार्‍या महिलेस आरबीएसकेच्या पथकाने मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा शहराकडून पिंपळगाव हरेश्‍वर कडे जात असलेल्या दुचाकीला गायीचा धक्का लागल्याने अपघात होवून त्यात पिंपळगाव हरेश्‍वर येथील रहिवासी वंदना तेली यांना कमरेला व पाठीला मार लागल्याने त्या रस्त्यावरच विव्हळत होत्या. तेव्हाच जिल्हा रूग्णालय, जळगाव अंतर्गत आर.बी.एस.के. च्या आश्रमशाळा तपासणी पथकातील डॉ. गिरिश पाटील, डॉ. करूणा भालेराव, विनोद बोदडे व नीलेश चौधरी हे आपल्या वाहनाने शासकिय आश्रमशाळा, सातगाव डोंगरी येथून परतत असतांना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी लागलीच अपघातग्रस्तांना तात्काळ आपल्या वाहनाने पाचोरा येथिल रूग्णालयात नेले. यामुळे अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळाले. यामुळे रूग्णासह त्यांच्या नातेवाईकांनी डॉ. गिरीश पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांचे आभार मानले आहेत.

Protected Content